Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeताज्या घडामोडीमुकेश खोबरेकरांकडून संविता आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

मुकेश खोबरेकरांकडून संविता आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

बांदा,ता.३०: येथील मुकेश खोबरेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून पणदूर येथील संविता आश्रमास भेट देवून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत वाढदिवस साजरा केला. दरवर्षी खोबरेकर हा उपक्रम राबवितात. श्री. खोबरेकर यांचा वाढदिवस आश्रमातील उपस्थित्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. यावेळी साईनाथ धारगळकर, संदीप नार्वेकर, विक्रांत नेवगी, प्रशांत कासार, अनिल पिंगुळकर, शेर्लेचे माजी सरपंच उदय धुरी, नंदेश खोबरेकर आदी उपस्थित होते.
या सामाजिक कार्यासाठी उद्योजक सलील वळंजू, सुशील गुळेकर, सिद्धेश वेंगुर्लेकर, जयंत महाबळ, मेलवीन डिसिल्व्हा, सौ. मनीषा मयेकर, दयानंद नेवगी, गजानन पावसकर, सर्वेश गोवेकर, पुरुषोत्तम पावसकर, सौ. आनंदी वराडकर, साक्षी वराडकर, सौ. विक्रमी मांडवेकर, अमोल भांबुरे, तुषार मोरे, शंकर गवस, कमलाकर नेवगी, अमित महाले, सुनील आरोसकर, अभिजीत देसाई, राजू धामापूरकर, रविकिरण म्हावळणकर, बांदा सरपंच अपेक्षा नाईक, तन्मय सुकी, संतोष नाटेकर, प्रसाद शिरसाट यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments