वैभववाडी,ता.३०: येथील मुख्याध्यापिका सौ. ज्योती जयवंत पवार यांना “वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून उपक्रमशील, प्रयोगशील, सर्जनशील तसेच शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदलाच्या माध्यमातून उद्याच्या विकसित भारताचे सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ज्योती पवार यांना नुकताच जाहीर झाला आहे.
पवार या एडगांव गावच्या रहिवाशी आहेत. विद्या मंदिर करुळ गावठण प्रशालेत सध्या त्या कार्यरत आहेत. यापूर्वी देखील त्यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार व अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कार जाहीर होताच ज्योती पवार यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.