Thursday, November 7, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत शिवसेनेच्या मेघा भरतीला सुरुवात

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत शिवसेनेच्या मेघा भरतीला सुरुवात

माजी नगरसेविका, ऑटो रिक्षा युनियन अध्यक्षांसह महिला व युवकांचा समावेश

वेंगुर्ले : ता.३०
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यात शिवसेनेने मेघा भरतील सुरुवात केली आहे. आज तीन ठिकाणी झालेल्या मेळाव्यांमध्ये माजी नगरसेविका गीता अंधारी यांच्यासह खानोली येथील अनेक युवक तसेच तालुका ऑटो रिक्षा युनियन चे अध्यक्ष एकनाथ राऊळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यापुढेही प्रवेशाचे कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
दोन वेळा नगरसेविका पदावर राहिलेल्या सौ. गीता अंधारी यांना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांचा हस्ते प्रवेश दिला. यावेळी उपजिल्हा संघटक सौ. स्वेता हुले, नगरसेवक संदेश निकम , नगरसेविका सौ. सुमन निकम , शहरप्रमुख अजित राऊळ, उपनगराध्यक्ष सौ. अस्मिता राऊळ, सुरेश भोसले, रजत साळगावकर, सौ. मंजुषा आरोलकर, समन्वयक विवेक आरोलकर, दिलीप राणे, हेमंत मलबारी, सतीश हुले, श्रीकृष्ण गावकर व इतर शिवसेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते. तर खानोली येथील युवकांनी आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत युवासेना उपतालुका अधिकारी दादा सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिद्धेश हळदणकर, गौरेश परब, प्रितेश वराडकर, शिवाजी रांजणकर, लक्ष्मण पालव यांच्यासाहित इतर युवकांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, सचिन देसाई, सभापती सुनील मोरजकर, उभादांडा सरपंच देवेंद्र डीचोलकर, तालुकाप्रमुख बाळू परब, जि प सदस्य नितीन शिरोडकर, युवासेना जिल्हा अधिकारी मंदार शिरसाट, उपजिल्हा अधिकारी सागर नाणोस्कर, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, दादा सारंग, नीतीन मांजरेकर, वेतोरा उपसरपंच नाना वालावलकर, उपशाखाप्रमुख मदन राऊळ, विभागप्रमुख अनिल गावडे, सतीश वेतोरकर,
उपतालुका संघटक नम्रता बोवलेकर, मठ शाखाप्रमुख ययाती नाईक, वेतोरा महिला संघटक सुमित्रा गावडे, खानोली ग्रा प सदस्य प्रतिभा खानोलकर यांच्यासहित वेतोरा जि प मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान उभादांडा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत तालुका ऑटो रिक्षा युनियन चे अध्यक्ष एकनाथ राऊळ व सहकारी सहित अणसुर व मोचेमाड येथील माधवी गावडे, ग्रा प सदस्य श्वेता गावडे, लक्ष्मी गावडे यांच्यासहित असंख्य महिलांनी तर युवक गोविंद कुमार व सहकारी, अणसुर येथील पांडुरंग गावडे व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
वेंगुर्ला तालुका ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ राऊळ यांच्यासाहित दाजी गवंडे, सतीश कांबळी, राजन कारंगूटकर, श्री केळुसकर यांनी सेनेत प्रवेश केला. दिपक केसरकर यांनी दाभोली गावासाठी विकास कामासाठी दिलेला निधी तसेच त्यांच्या कामावर प्रभावित होऊन संदेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्रवेश केला असल्याचे एकनाथ राऊळ यांनी सांगितले. यावेळी शिसेनेचे उपरोक्त सर्व पदाधिकारी यांच्यासह प. स. सदस्य अनुश्री कांबळी, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments