राजन तेली;शिवसेनेच्या मळेवाड सरपंचासह कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश
सावंतवाडी ता.३०:
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत.त्यांचा रोष शिवसेनेवर नाही तर तो व्यक्तीवर आहे.असा आरोप माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे केला.मळेवाड येथील सरपंच सचला केरकर यांच्यासह तेथील अनेक शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला.याप्रसंगी श्री.तेली बोलत होते.
श्री.तेली पुढे म्हणाले,पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीला ग्रामीण भागातील जनता कंटाळली आहे.ते मंत्री असून सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना ओळख दाखवत नाहीत असा त्यांचा रोष आहे.त्यामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते सध्या भाजपात प्रवेश करत आहे. आणि यापुढेही करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लाडोबा केरकर, निलेश राणे,कांता मुळीक, नामदेव राणे,स्वप्निल राणे, विजय चराटकर,विठ्ठल कोरगांवकर,झिला केरकर,हर्षद केरकर,आपा काळोजी,आनंद केरकर,राहुल नाईक ,सचिन नाईक,बाळा राणे,संजय राणे,प्रशांत केरकर,अभय केरकर,सचिन नाडर, आनंद नेवगी,तालुकाध्यक्ष महेश सारंग,प्रसाद अरविंदेकर,विक्रांत आजगावकर आदी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.