सावंतवाडी पालिकेच्या वक्तृत्व स्पर्धेत अस्मि मांजरेकर प्रथम

370
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,३०:

येथील नगर पालिकेतर्फे आयोजित केलेल्या सावंतवाडी तालुकास्तर शालेय वक्तृत्व स्पर्धेचा लहान गटात सुधाताई कामत शाळा नंबर २ ची विद्यार्थीनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कळसुलकरचा दत्तप्रसाद मनोहर परब हिने तर तृतीय क्रमांक शाळा नंबर ६ चा तनिष्का अजित राणे व शाळा नंबर 2 चा योगेश विवेकानंद जोशी यांनी पटकावला.
समाज मंदिर येथील ग्रंथालयात ही स्पर्धा झाली. मोठ्या गटात चराठे शाळा नंबर १ चा दिक्षा बोन्द्रे हिने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय लता महेश परब तर तृतीय यश तुकाराम जाधव यांनी पटकावला. स्पर्धेचं परीक्षण राहूल कदम व रश्मी पावसकर हिने केले. उदघाटन मुख्याधिकारी संतोष जिरगे, स्पर्धा प्रमुख ग्रंथपाल श्रावनी सावंत. पालिका कर्मचारी परवीन शेख, दीपक म्हपसेकर, पटेल., यांच्या उपस्थितीत झाले.

\