त्रिमूर्ती मित्रमंडळाचे आयोजन; बेळगावातून उपस्थित असलेल्या दोन संघाना विशेष पारितोषिक…
सावंतवाडी,ता.०३: माजगाव- मेटवाडा येथील त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “दिपावली शो टाईमच्या” रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे वैष्णवी बोडके लहान गटातून तर विजय आलासे हा मोठ्या गटातून मानकरी ठरले आहेत. मंडळाच्या माध्यमामून नुकतीच ही स्पर्धा घेण्यात आली. यात लहान गटातून व्दितीय क्रमांक निधी खडपकर, तृतीय क्रमांक शोर्या सोनसुरकर तर उत्तेजनार्थ दिशम परब यांना गौरविण्यात आले तर मोठ्या गटातून व्दितीय क्रमांक घनशाळ सोनळे, तृतीय क्रमांक पुर्वी मेस्त्री आणि उत्तेजनार्थ म्हणून जयेश वेंगुर्लेकर यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेनिमित्त खास बेळगाव येथून आलेल्या चेतन कलामंच आणि अबिंका ग्रुप यांना विशेष बक्षीस देवून गौरविण्यात आले.
यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी त्रिमूर्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन परब, उपाध्यक्ष सचिन मोरजकर, दत्तमंदिर कमिटीचे माजी अध्यक्ष अण्णा परब, महालक्ष्मी तथास्तू मॉलचे विनायक कोडल्याळ, विश्रांती चायनीज कॉर्नरचे राजेश नार्वेकर, पत्रकार अमोल टेेंबकर, रुपेश पाटील, भुवन नाईक यांच्यासह परिक्षक तुळशीदास आर्लेकर, अनिकेत आसोलकर, सावन जळवी, प्रशांत मोरजकर, गितेश प्रभावळकर, प्रसाद सावंत, हर्षल आकेरकर, सौरभ पडते, राज परब, आशुतोष सावंत, मंगेश पावसकर, बापु भोगणे, सचित कुडतरकर आदी उपस्थित होते.