वेंगुर्ले,ता.०३: कोल्हापूर येथे आयोजित अबॅकसच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शिरोडा सिंधुदुर्ग येथील तेजस्वी अबॅकस या अबॅकस प्रशिक्षण संस्थेला सलग सातव्या वर्षी बेस्ट सेंटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे झालेल्या अबॅकस च्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दीड हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, रेडी, वेंगुर्ला या ठिकाणी कार्यरत असलेल्या तेजस्वी अबॅकसच्या पाच विद्यार्थ्यांनी विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली तर अकरा विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. या विद्यार्थ्यांपैकी शिरोडा येथील गुरुनाथ फोडनाईक व वेंगुर्ला येथील व्योम सावळ या विद्यार्थ्यांची अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सहभागी झालेल्या आणि विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मनोज शारबिद्रे व संचालिका नूतन शारबिद्रे यांनी अभिनंदन केले आहे.