वेंगुर्ले येथे ६ ऑक्टोबर रोजी मोफत बालनाट्य प्रशिक्षण

115
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.३०
आधार फाउंडेशन, सिंधुदुर्ग व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा- वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरवाचनालय, वेंगुर्ला येथे मोफत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरासाठी ६ वर्ष ते १२ वर्ष या वयोगटातील मुला- मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार असून अभिनयातील बारकावे, समाधीटपणा, संवाद फेक, शारीरिक हालचाली तसेच चेहऱ्यावरील हावभाव यांचे मार्गदर्शन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नाट्यक्षेत्रातील केदार सामंत, जेष्ठ दिग्दर्शक व पद्मा फातर्पेकर, जेष्ठ मार्गदर्शक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी ज्या शाळेतील इच्छुक विध्यार्थी प्रशिक्षणाथिंची यादी शिक्षकांना द्यायची असेल किंवा मुलांना यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० पर्यंत वेंगुर्ला गॅस सर्व्हिस, वेंगुर्ला (फोन नं- २६२१०५/२६३१०५) येथे आणून द्यावीत, असे आवाहन आधार फाउंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

\