Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात चाळीशी ते पन्नाशी आतील सर्वाधिक मतदार...

सिंधुदुर्गात चाळीशी ते पन्नाशी आतील सर्वाधिक मतदार…

सिंधुदुर्गनगरी ता. ३०:

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर 6 लाख 69 हजार 665 मतदार निश्चित झाले आहेत. या मतदारांमध्ये 40 ते 49 वयोगटातील सर्वाधिक 22.37 टक्के मतदार आहेत. त्या पाठोपाठ 30 ते 39 वयोगटातील 17.49 टक्के मतदार आहेत. तर 80 वयोगटावरील 32 हजार 37 म्हणजेच 4.77 टक्के मतदार आहेत.

विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबर रोजी जाहिर झाली असून त्या पाश्वभूमीवर जिल्ह्याची निवडणूक यंत्रणा तयार झाली आहे. या जिल्ह्यात कणकवली-देवगड-वैभववाडी, कुडाळ-मालवण, सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग हे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या तिन्ही मतदार संघात मिळून 6 लाख 69 हजार 665 मतदार आहेत. यामध्ये 20 ते 29 या वयोगटातील एक लाख 6 हजार 2 एवढे मतदार आहेत. ही टक्केवारी 15.94 टक्के एवढी आहे. 30 ते 39 वयोगटातील एक लाख 17 हजार 386 एवढे मतदार आहेत. ही टक्केवारी 17.49 एवढी आहे. 40 ते 49 वयोगटातील एक लाख 50 हजार 136 एवढे मतदार आहेत. ही टक्केवारी सर्वाधिक 22.37 टक्के एवढी आहे.

50 ते 59 या वयोगटातील एक लाख 16 हजार 788 मतदार आहेत. ही टक्केवारी 17.40 टक्के आहे. 60 ते 69 या वयोगटातील 80 हजार 801 मतदार असून 12 .03 टक्के एवढी ही मतदार संख्या आहे. 70 ते 79 वयोगटातील 8.8 टक्के मतदार असून 54 हजार 284 मतदार आहेत. तर 80 वयोगटावरील 4.77 टक्के एवढे मतदार आहेत. 32 हजार 37 एवढी ही मतदार संख्या आहे.

विधानसभेला पहिल्यांदाच साडे अकरा हजार मतदार मतदान करणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेला पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या 11 हजार 431 एवढी आहे. ही टक्केवारी 1.70 टक्के एवढी आहे. ही आकडेवारी निर्णायक नसली तरी 20 ते 29 वयोगटातील एक लाख 68 हजार 2 एवढे मतदार असल्याने आणि 30 ते 39 वयोगटातील एक लाख 17 हजार 386 मतदार असल्याने विधानसभेला उभे राहणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य या युवा मतदारांच्या हातात राहणार आहे.

जिल्ह्यातील 659 मतदान केंद्रांत एकच मतदान केंद्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. जिल्ह्यात एकच पॉलिंग केंद्र असणाऱ्या केंद्रांची संख्या 659 एवढी आहे. 2 मतदान केंद्रे असणारी 112 केंद्रे आहेत. 3 मतदान केंद्रे असणारी 9 तर 5 मतदान केंद्रे असणारे एक केंद्र आहे. जिल्ह्यात एकूण 915 मतदान केंद्रे असून त्यातील 822 ग्रामीण भागात तर 93 शहरी भागात मतदान केंद्रे आहेत.

145 मतदान केंद्रे संपर्क क्षेत्राच्या बाहेर

जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रा पैकी 145 मतदान केंद्रे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. एवढ्या मतदार संघात मोबाईल, फॅक्स याच्यासह साधी दूरध्वनीची सुद्धा सुविधा नाही. मात्र 179 मतदान केंद्रांत इंटरनेट सुविधा आहेत. तर 92 केंद्रे वेब कास्टिंगच्या निगरानीखाली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments