Monday, April 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"आमचं ठरलं" म्हणणाऱ्यांना थारा देऊ नका

“आमचं ठरलं” म्हणणाऱ्यांना थारा देऊ नका

संजय पडते: दीपक केसरकरच शिवसेना भाजपचे युतीचे अधिकृत उमेदवार

वेंगुर्ले : ता.३०

शिवसेना-भाजप युतीचे पालकमंत्री दीपक केसरकर हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे आमचे ठरलंय आहे असे सांगून मतदार संघात घिरट्या घालणा-या अपक्ष उमेदवाराला थारा देऊ नका. केसरकर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले
वेंगुर्लेतील मेळाव्यात माजी नगरसेवक शाम गावडे, मच्छिमार नेते भाई मालवणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले शहरातील मेळाव्यात शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
या मेळाव्याला मोठ्या संख्येने वेंगुर्लेवासीय उपस्थित होते.
साई दरबार येथे संपन्न झालेल्या या मेळाव्यात उपस्थित सर्वच मान्यवरांनी व वेंगुर्लेवासीयांनी दीपक केसरकर यांना भावी कँबिनेट मंत्री म्हणून पाहण्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत आणि तुमच्या पाठीशी आहोत असे ठामपणे सांगितले.
पालकमंत्री दिपक केसरकर यांनी मतोश्रीवरून एबी फॉर्म घेऊन थेट वेंगुर्लेत येऊन देव रामेश्वर व मानसिश्वर यांचे आशिर्वाद घेतला. यावेळी भाईंनी बोलताना आपले प्रेम असेच आपल्यावर ठेवा असे सांगितले.
या मेळाव्यात जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विक्रांत सावंत, सभापती सुनील मोरजकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, महिला तालुकाप्रमुख सुकन्या नरसुले, नगरसेवक संदेश निकम, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सुनील डुबळे तसेच सचिन वालावलकर, जि. प. सदस्य नितीन शिरोडकर, सचिन देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments