दोडामार्ग,ता.१०: भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे डाॅ. संजय खडपकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करियर विषयक मार्गदर्शन करण्यात आले. बारावी नंतर उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. यात कॉमर्स शाखे मधून अकाऊंटंट्स किंवा सीए, एमबीए, शासनाच्या विविध सेवा यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी, केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी, राष्ट्रीयकृत बँकांमधील करिअरच्या संधी, पोलीस भरती अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रा. नंदकुमार नाईक, हळवे कॉलेजचे ग्रंथपाल रामकिसन मोरे, हळबे कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रोहन बागकर, प्रा. दर्शनी कोटकर, वेदांत फाउंडेशनच्या प्रा. सेफाली गवस आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन भेडशी हायस्कूलचे प्रा.अमित करपे तर आभार श्रेया गवस यांनी मानले.