एम.बी.चौगले; वेंगुर्लेत “महिला व त्यांचे मानवाधिकार” विषयावर चर्चासत्र संपन्न…
वेंगुर्ले,ता.१०: चांगला समाज जर निर्माण व्हायचा असेल तर समाजाला अधिकारांची व कर्त्यव्याची जाणीव असणे गरजेची आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कायद्याने दिलेल्या अधिकाराची जाणीव असावी, असे प्रतिपादन डॉ. एम. बी. चौगले यांनी केले.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, महिला व बाल विकास विभाग कुडाळ, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, महिला विकास कक्ष, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी अधिकार दिना निमित्य वेंगुर्ले महाविद्यालयात “महिला व त्यांचे मानवाधिकार” याविषयावर चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी श्री. चौगले बोलत होते.
यावेळी संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभाग कुडाळ, वेंगुर्ला मिलिंद कांबळे, सहाय्यक संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभाग कुडाळ, वेंगुर्ला अक्षय कानविंदे, महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. मनीषा मुजुमदार, डॉ. धनश्री पाटील, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. लक्ष्मण नैताम, प्रा. जे.वाय. नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पांडुरंग गावडे, डॉ. कमलेश कांबळे, डॉ. जी. पी. धुरी, डॉ.सचिन परुळकर यांनी विशेष प्रयत्न केले.