Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विलवडे शाळेचे यश...

बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विलवडे शाळेचे यश…

बांदा,ता.१०: नुकत्याच घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विलवडे नं.१ शाळेच्या रुही सावंत हिने कबड्डी लहान गटातून यश संपादन केले. तर सांस्कृतिक महोत्सवात समभायान लहान गटातून विलवडे नं.२ च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यांना वाद्यवृंद म्हणून पूजा मेस्री, जयेश दळवी व भाविक सावंत उत्कृष्ट साथ दिली. या यशाबद्दल सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, शा. व्य. समिती अध्यक्षा रश्मी सावंत, विशाखा दळवी, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, अंगणवाडी सेविका सायली दळवी, मदतनीस मनाली दळवी, शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments