बांदा,ता.१३: येथील प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १५ डिसेंबरला देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे जत्रोत्सवा पासुन श्री बांदेश्वराच्या दर सोमवारी होणाऱ्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.
यानिमित्त सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा होऊन दर्शन, श्री भुमिका माऊली ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे कार्यक्रमास आरंभ होईल. रात्रौ ठिक ९ वाजता श्रींचा मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा आरंभ होईल. पालखी सोहळा झाल्यानंतर वार्षिक नित्य पुराण वाचन कार्यक्रमाची सांगता होईल. त्यानंतर जत्रोत्सवानिमित्त खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.
सोमवार १६ डिसेंबरला सकाळी दहिकाला होईल. त्यानंतर वाजत गाजत श्रींची पालखी फेरी नदीघाटावर श्रीकृष्ण स्नानासाठी जाईल व स्नान करुन पारंपारिक मार्गाने मंदिराकडे परत येईल. मंगळवार दिनांक १७ डिसेंबरला दुपारी समाराधना कार्यक्रम होईल.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
बांद्यातील श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा १५ डिसेंबरला जत्रोत्सव….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES