देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे थाटात उदघाटन

140
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ ता 1
अॅड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे हेच या स्पर्धेचे यश आहे असे प्रतिपादन सकल मराठा समाजाचे जिल्हाअध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी ४४ व्या कै. अॅड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ कुडाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४४ व्या अॅड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय स्पर्धेचा शुभारंभ नुकताच झाला. हा शुभारंभ  अॅड. सुहास सावंत व उद्योजक महेश ओटवणेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी  श्री देवी समादेवी मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष शिरसाट, श्री देव मारुती मंदिराचे अध्यक्ष मंदार शिरसाट, माजी सरपंच अरविंद शिरसाट, उद्योजक ओंकार देसाई, अविनाश देसाई, विजय देसाई, मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, परिक्षक संजय दळवी, नुतन परब तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदरची ही स्पर्धा रविवार दि. २९ सप्टेंबर ते सोमवार दिनांक ७ ऑक्‍टोबर या कालावधीत होणार आहे. यावेळी  अॅड. सुहास सावंत यांनी सांगितले की, वकील आणि भक्ती मार्ग वेगळे असे समजले जाते. कै. अभय देसाई यांनी त्यांच्या जीवनात भक्ती मार्गाचा जोपासना केली. अभय देसाई हे समाजवादी विचारसरणीचे होते. व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजवादी विचारसरणीची जोपासना करीत मी ही कार्य सुरू ठेवले आहे. पुर्वीचे संस्कृत भाषेतील ज्ञान सुमारे १२०० वर्षापुर्वी जनमानसा पर्यंत मराठी भाषेतुन पोहचविण्याचे काम संतानी केले. व भजन कलेचा वापर करून समाज प्रबोधनाचे कार्य केले असेही अॅड.  सुहास सावंत यांनी सांगितले.तसेच यावेळी मंडळाचे सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, सुशील परब, महेश काणेकर, आप्पा महाडीक, रूपेश कुडाळकर,चंदन दळवी, सत्यवान राऊळ तसेच भजन रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मंदिरात सतत १० वर्षे नवरात्री उत्सवात ज्ञानेश्वरी ग्रंथपारायण करणारे महादेव डिचोलकर महाराज यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार कुंटे, सुत्रसंचालन महेश कुडाळकर यांनी केले. तर आभार केदार राऊळ यांनी मानले.
कुडाळ
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ यांच्यावतीने आयोजित केलेल्या 44 व्या अॅड. कै. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा शुभारंभ करताना सुहास सावंत यावेळी महेश ओटवणेकर, संतोष शिरसाट, मंदार शिरसाट, विजय देसाई, अरविंद शिरसाट तसेच इतर मान्यवर.

\