वैभववाडी,ता.१३: आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनीषा टक्के व श्रीम. जोत्स्ना पाटील यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता राखण्याचे महत्व,आहार आणि त्या संदर्भातील गैरसमज व समस्या दूर करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब वैभववाडीच्या वतीने विद्यार्थिनीना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब वैभववाडीचे अध्यक्ष श्री.प्रशांत गुळेकर, सदस्य श्रीम. संजना रावराणे व श्रीम. स्नेहल खांबल, आरोग्य सेविका श्रीम. जांभवडेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, अधीक्षक श्री. संजय रावराणे, प्रा. डॉ. व्ही. सी. काकडे, प्रा.एस.एस. पाटील आदींसह महिला विकास कक्षाचे सर्व सदस्य व विद्यार्थिनी उपस्थित होते.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES