वेंगुर्ला,ता.१३: रत्नागिरी-पावस येथील सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या १२२ व्या जयंतीसाठी वेंगुर्ला ते पावस अशी पालखी शुक्रवार २० डिसेंबरला वेंगुर्ला येथून निघणार आहे. यंदाचे हे पालखी सोहळ्याचे ४९वे वर्ष आहे.
यानिमित्त २० ला सकाळी ८ वा. भटवाडी येथील दिलीप सामंत यांच्या विठ्ठल मंदिरातून या पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. रात्रौ ही पालखी दाभोसवाडा विठ्ठल मंदिरात राहणार आहे. २१ ला दुपारी वेतोरे, रात्रौ कुडाळ, २२ ला सकाळी हुमरमळा, दुपारी कसाल, रात्रौ कणकवली, २३ ला सकाळी हुमरट, नांदगांव, तळेरे, दुपारी वारगांव, रात्रौ खारेपाटण, हातीवले, २४ ला सकाळी राजापूर विठ्ठल मंदिर, ओणी, वाटूळ, दुपारी कुवे, रात्रौ लांजा, २५ ला दुपारी कुरणे, रात्रौ पुनस, २६ ला सकाळी सुकादेवी, दुपारी सापुचे तळे, रात्रौ पावस, २७ ला पावस येथे जन्मसोहळा संपन्न होणार आहे. तरीही ज्या भाविकांना या पालखी सोहळ्यात सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी सदानंद गिरप (७०८३८४२१९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांचा २० डिसेंबरला वेंगुर्लेत पालखी सोहळा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES