Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकाला तीन वर्ष सश्रम करावास...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकाला तीन वर्ष सश्रम करावास…

ओरोस,ता.१३: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रुपेश गोपाळ ढवण याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी दोषी ठरविले आहे. तीन वर्ष सश्रम करावास व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
कणकवली पोलीस ठाणे अंतर्गत कार्यक्षेत्रात २०१९ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनयभंग आणि पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपी रुपेश गोपाळ ढवण याने तेरा वर्षीय पीडित मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. कणकवली पोलीस ठाण्याच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रूपाली गोरड यांनी तपास केला होता. या खटल्यात सरकार तर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी सर्व साक्षीदार तपासून युक्तिवाद देखील केला होता. हा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी आरोपीला भा द वि कलम ३५४ व पोक्सो कायदा कलम ८ अन्वये दोषी धरून ३ वर्ष सश्रम करावास व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्याच्या सुनावणी वेळी पैरवी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अनिता कोळी वगैरे टीम यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments