Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहरप्रमुख अजित राऊळांचा राजीनामा...

ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहरप्रमुख अजित राऊळांचा राजीनामा…

वेंगुर्ले,ता.१३: ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शहरातून पक्षाच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे.
वेंगुर्ले शहरात ठाकरे सेना वाढविण्यासाठी अजित राऊळ यांनी सहकाऱ्यांसोबत अनेक उपक्रमांमध्ये आणि आंदोलन मध्ये सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीत शहरातून चांगला प्रतिसाद खासदार विनायक राऊत यांना मिळाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांना चांगले मतदान झाले नाही. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून तसेच या पदावर नवीन यांना संधी मिळावी आणि त्यांनाही काम करता यावे म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे अजित राऊळ यांनी सांगितले. दरम्यान यापुढे शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करण्यासाठी त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments