संशयिताला एका दिवसाची पोलिस कोठडी; आज केले होते न्यायालयात हजर…
सावंतवाडी,ता.१३: शहरातील बुराणगल्ली परिसरात गुटख्याचा साठा केल्याप्रकरणात संबंधित आमिन अब्दुल गनी शहा (वय ४४, रा. बुराणगल्ली) याच्या समवेत आणखी कोण होते? याचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. यातील संशयिताने आणलेला माल नेमका कोठुन आणला? तो कोणाला विकणार होता? त्याच्या समवेत आणि कोण आहेत का? याचा पोलिस करीत आहेत. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणचे उपनिरिक्षक गुरूनाथ कोयंडे यांनी दिली.
येथील बुराणगल्ली परिसरात संबंधित संशतिय हा गुटख्याचा साठा करीत होता, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता त्याच्याकडे २ लाख ८ हजार रुपयाचा मुद्देमाल आढळून आला होता. या प्रकरणी रात्री उशिरा त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.