दिल्लीत मान्यवरांच्या हस्ते वितरण; टॅव्हल्स प्लस लिझर संस्थेकडुन पाककलेची दखल…
सावंतवाडी,ता.१३: येथील संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रध्दाराणी भोसले या दाम्पत्याला भारतातील सर्वोत्कृष्ट “हेरिटेज पाककृती अवार्ड” प्राप्त झाला आहे. नुकतेच दिल्ली येथे या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. हा पुरस्कार टॅव्हल्स प्लस लिझर या संस्थेकडुन देण्यात आला.
भोसले दाम्पत्याने सावंतवाडीच्या राजवाड्यात पंचतारांकित हॉटेल सुरु केले आहे. या माध्यमातून देशविदेशातील पर्यटकांना त्यांनी सावंतवाडीसह कोकणच्या संस्कृतीची आणि खाद्यपदार्थाची ओढ लावली आहे. याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.