कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात वैभव नाईकांना पुन्हा संधी…

2

उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म प्रधान; कुडाळात शिवसैनिकांचा जल्लोष…

कुडाळ.ता,१:कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार वैभव नाईक यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आ.नाईक यांना एबी फाॅर्म देण्यात आला. याबद्दल सायंकाळी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने येथील शाखेसमोर फटाके फोडत शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. आवाज कुणाचा शिवसेनेचा…वैभव नाईक तुम्ही आगे बढो हम तुम्हारा साथ है आदी घोषणा शिवसैनिकांनी देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, माजी जि प सदस्य संजय भोगटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, जीवन बांदेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख संदीप म्हाडेश्वर, शहर प्रमुख कृष्णा तेली, राजू गवंडे, अनंत पाटकर, उदय,मांजरेकर, अक्रम साठी, अनुप चेंदवणकर, रूपेश कांबळी, सतीश कुडाळकर, नंदू कुंटे आदींसह शिवसेना-युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

13

4