कुडाळ,ता.१४: ५२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जि. प. प्राथमिक शाळा कुडाळ- कविलकाटे चे पदवीधर शिक्षक गौरव शंकर नाईक यांच्या विज्ञान समजून घेताना या शैक्षणिक प्रतिकृतीने प्राथमिक शिक्षक गटातून कुडाळ तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. दैनंदिन जीवनातील सुमारे ५० पेक्षा जास्त विविध घटना व उदाहरनांचा वैज्ञानिक संकल्पनाशी असलेला सहसंबंध सहजगत्या स्पष्ट करता येणे हे या प्रतिकृतीचे वैशिष्ट्य होते.
वर्ग अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेता यावा यासाठी या प्रतिकृतीमध्ये विशेष प्रयोगांची मांडणी केलेली होती.
गौरव नाईक यांना मिळालेल्या या यशाबद्दल पंचायत समिती कुडाळचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी वासुदेव नाईक गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, केंद्रप्रमुख केंद्र कुडाळ भिकाजी तळेकर शाळा कुडाळ कविलकाटे मुख्याध्यापिका माधुरी राणे, शा. व्य. समिती अध्यक्षा काळप, कुडाळ केंद्रातील सर्व सहकारी शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.