आढावा बैठकीत जाहीर;कर्मचाऱ्यांसह साळगावकर भाऊक,दोघांनाही अश्रू अनावर…
सावंतवाडी ता.०१: येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अखेर राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.येत्या दोन दिवसात त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे आज पालिका कर्मचार्यांच्या आढावा बैठकीत जाहीर केले.यावेळी त्यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आभार मानले.आपल्याला आजपर्यंत केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले.आपण आता विधानसभा लढविणार आहे.त्यामुळे येत्या दोन दिवसात आपण राजीनामा देऊ,असे त्यांनी जाहीर केले.
श्री.साळगावकर यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.अनेकांना रडू फुटले,कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या या भावनिक प्रतिसादानंतर खुद्द साळगावकरांनाही अश्रूचा बांध आवरता आला नाही.यावेळी सर्व पालिकेचे कर्मचारी,अधिकारी उपस्थित होते.आज जाता जाता साळगावकरांनी खास आढावा बैठक घेऊन पालिका कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.