“स्वच्छ्ता ही सेवा”अंतर्गत कसालमध्ये जनजागृती फेरी

82
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.१:

“स्वच्छता ही सेवा अभियान” या मोहिमेंअंतर्गत कसाल महाविद्यालयचे विद्यार्थी, महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्र व महामार्ग चौपदरीकरण बांधकाम ठेकेदार दिलीप बिल्डकाँन यांच्या संयुक्त विद्यामाने स्वच्छते विषयी जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्याची काळजी घ्या. प्लॅस्टिक पिशवीचा वापर बंद करा. रस्ते, नाले, सार्वजणिक ठिकाणे स्वच्छ ठेवा. याबाबतची जनजागृती “स्वच्छता ही सेवा अभियान” अशी प्रभात फेरी काढत करण्यात आली. यावेळी महामार्ग चौपदरीकरण अधिकारी-कर्मचारी, कसाल वाहतूक महामार्ग पोलीस अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी वर्ग मोठ्या संखेने प्रभात फेरीत सहभागी होत कसाल महाविद्यालय, बाजारपेठ, एसटी स्टॅण्ड ते पुन्हा कसाल महाविद्यालय अशी फेरी काढण्यात आली. यामध्ये कसाल महामार्ग वाहतूक साहाय्यक पोलीस निरिक्षक अशोक जाधव, सा.पो. उप. निरिक्षक उमाकांत पालव, मुख्याध्यापक गुरुदास कुसगांवकर यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.

\