वेंगुर्ले शाळा नं ४ मध्ये अत्याधुनिक विज्ञान व गणित प्रयोगशाळा

2

तालुक्यातील पहिली शाळा : मुलांना विज्ञानाची लागेल गोडी

वेंगुर्ले : ता.१
वेंगुर्ले तालुक्यातील शाळा वेंगुर्ले नं ४ या शाळेला जिल्हा परिषदेमार्फत अत्याधुनिक विज्ञान व गणित प्रयोगशाळा प्रदान करण्यात आली आहे. सर्वसमावेशक असे चांगली माहिती असणारी अत्याधुनिक अशी ही तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे. या प्रयोगशाळेमुळे शिकणाऱ्या मुलांना विज्ञानाची माहिती अधिक सोप्या पद्धतीने समजणार आहे.
वेंगुर्ले शाळा नं.४ येथील ह्या प्रयोगशाळेत स्वयंचलित व विजेवर चालणारी जवळ जवळ ५०० विविध प्रकारची यंत्रे आहेत. एका एल. एफ. डी. टीव्ही सह १९९ प्रकारच्या गणिती क्रियांवर आधारित येथे साहित्य आहे. लवकरच ह्या विज्ञान गणित प्रयोग्यशाळेचे उद्घाटन होऊन सदर आधुनिक साहित्याचा वापर विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनात होणार असून मुलांना वैज्ञानिक व गणितीय संकल्पना व संबोध प्रत्यक्ष हाताळून स्पष्टीकरण होण्यास मदत होणार आहे. शाळा वेंगुर्ले नं ४ च्या विद्यार्थ्यांबरोबरच ह्या परिसरातील ईतर शाळांना सुद्धा ह्या नाविन्यपूर्ण व आधुनिक विज्ञान गणित प्रयोगशाळेचा लाभ मिळणार आहे.
शाळेला ही प्रयोगशाळा प्राप्त करून दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व पालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत. शाळेच्या नव्या इमारती बरोबर मुलांना नव्या अत्याधुनिक प्रयोशाळेचा वापरही करता येणार असल्याने हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.

9

4