वैभव नाईक;राणेंना सोडचिट्टी दिल्याबद्दल केले अभिनंदन…
कणकवली,ता.०१:
स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत राणेंना सोडचिट्ठी दिल्याबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान खासदार विनायक राऊत,पालकमंत्री दीपक केसरकर,व आपण स्वतः आपल्या पाठीशी आहोत.शिवसेना कार्यकर्तेही आपल्या पाठीशी राहतील अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी यावेळी श्री सावंत यांना दिली.
यावेळी शिवसेनेचे सचिन सावंत, शैलेश भोगले, राजू राठोड, भास्कर राणे हर्षद गावडे, बाळू पारकर, महेश देसाई, सुनील पारकर, भूषण परुळेकर, आंनद मर्गज, अरुण परब, बाबू आचरेकर, अनुप वारंग , मंजू फडके, सिद्धेश राणे, आदीसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.