प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये…
वेंगुर्ले : ता.१
कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून भोगवे ग्रामस्थांच्यावतीने येत्या १३ ऑक्टोबर रोजी भोगवे बीचवर गळाने(गरीने) मासे पकडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भोगवे येथील ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेत कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. केवळ भोगवे ग्रामस्थांसाठी या स्पर्धेतील प्रवेश पूर्णपणे मोफत असेल. स्पर्धेतील विजेता मिळालेल्या सर्वात मोठ्या माशाच्या वजनावरून ठरवला जाईल.
विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक १००००, द्वितीय पारितोषिक ५०००, व तृतीय पारितोषिक ३००० रुपये देऊन त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेचा कालावधी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. स्पर्धेत नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी ८४४६२५२१८२, ९८२१३२३७६५ किंवा ९४२१२६१८१९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.