केसरकरांना पुन्हा विजयी करून”हॅट्रिक”साधूया…

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संजय पडते; दोडामार्ग शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत आवाहन…

दोडामार्ग ता.०१:

पालकमंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा निवडून आणून हॅट्रिक साधूया असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले.येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले,तालुक्यात दिपक केसरकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात निधी आणला असून अनेक विकासकामे झाली आहेत.त्यामूळे येथे अपक्षांना थारा देऊ नका.युतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना विजयी करुया असे मार्गदर्शन केले.
यावेळी कुब्रंल सरपंच श्री.परब, ग्रा.प.सदस्य श्री.पालव तथा ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, संपर्कप्रमुख केशव धाऊसकर, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, गणेशप्रसाद गवस, दत्ताराम धाऊसकर, अँड.निता सावंत, नगराध्यक्ष लिना कुबल, श्रेयाली गवस, धनश्री गवस आदी शिवसैनिक उपस्थित होते.

\