भाजप शिरोडा शहर अध्यक्षपदी श्रीकृष्ण धानजी यांची निवड

76
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिवसेनेला धक्का : सागरतिर्थचे माजी शाखाप्रमुख पांडुरंग फोंडनाईक व ग्रा. प. सदस्या सुषमा गोडकर भाजपात

वेंगुर्ले,ता.१ 
शिरोडा शहर भाजप कार्यालय येथे रेडी जि.प.विभागने शिरोडा शहर भाजप ची सभा आयोजित केली होती. तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत भाजप शिरोडा शहर अध्यक्षपदी श्रीकृष्ण धानजी यांच्यासह कार्यकारिणीची निवड करण्यात आली. दरम्यान या सभेनंतर सभापती सुनिल मोरजकर यांना धक्का देत सागरतिर्थ येथे गावचे माजी शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग उर्फ पांडु फोंडनाईक व सागरतिर्थ ग्रामपंचायत सदस्या सुषमा राधाकृष्ण गोडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
शिरोडा येथे भाजपची सभा संपन्न झाली. यावेळी उपतालुकाध्यक्ष मनोज उगवेकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, रेडी जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, आरवली पं समिती शक्ती प्रमुख विदयाधर धानजी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये शहरअध्यक्ष – श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष – संतोष अणसूरकर, सरचिटणीस – सुरेश म्हाकले, खजिनदार – सीताराम (बबन) आडारकर, चिटणीस – दत्ताराम फटजी, चिटणीस – सौ.मनीषा भोपाळकर, महिला आघाडी अध्यक्षा – सौ.संध्या राणे, उपाध्यक्षा – सौ.मनाली खवणेकर, सदस्य – सिताबाई मसुरकर, सौ.पुष्पलता परब, सौ.स्नेहा गोडकर, सौ. सरिता मसुरकर, सौ.शुभांगी शिरोडकर, युवा मोर्चा अध्यक्ष – लक्ष्मण शिरोडकर, उपाध्यक्ष – सोमाकांत सावंत, सदस्य – सावळाराम गोडकर,
सिध्देश अणसूरकर, व्यापारी आघाडी – चंद्रशेखर गोडकर मच्छीमार आघाडी – सखाराम टांककर, शेतकरी आघाडी – लक्ष्मण शेटये, ज्येष्ठ नागरीक आघाडी – हरिश्चंद्र परब, ओ.बी.सी.आघाडी – शंकर वारखंडकर, अनुसूचित जाती आघाडी – अभिषेक शिरोडकर, सल्लागार – मनोहर होडावडेकर, हरी परब, शिवा नाईक, कार्यकारणी सदस्य – चंद्रकांत मामलेकर, आत्माराम(आनंद) परब, अनिल गावडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष म्हणून जयानंद शिरोडकर, तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून दिलीप गावडे, एकनाथ परब यांच्या नावाचा प्रस्ताव तालुक्याला देण्यात आला.
यावेळी सीताबाई मसुरकर व नंदिनी मसुरकर यांनी तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. तसेच वेंगुर्ले पंचायत समिती सभापतीच्या आसोली पंचायत समिती मतदार संघातील सागरतिर्थ गावचे माजी शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग उर्फ पांडु फोंडनाईक व सागरतिर्थ ग्रामपंचायत सदस्या सुषमा राधाकृष्ण गोडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . यावेळी त्यांच्यासोबत टाक व न्हैचीआड येथील ग्रामस्थ रत्नाकर धुरी, मोहन विष्णू मोंडकर, विष्णू सहदेव फोंडनाईक, मुरारी राजाराम वराडकर, उदय आरोंदेकर, सुधीर लवु धुरी यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी जेष्ठ नेते प्रकाश रेगे, ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, सरचिटणीस प्रशांत खानोलकर, शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, युवा मोर्चाचे हितेश धुरी, गणेश गावडे, हेमंत गावडे, विश्वनाथ गावडे, भास्कर गावडे, प्रदिप नाबर, सौ.विद्या रेगे उपस्थित होते.

\