आंबोली ता.०१: येथील प्रमुख कबुलायत गावकर शशिकांत सोनू गावडे व शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.हा कार्यक्रम आंबोली हॉटेल ग्रीन व्हॅली येथे पार पडला.या प्रवेशामुळे आंबोली मध्ये शिवसेना आणखीनच मजबूत झाली आहे.
माजी सरपंच शशिकांत सोनू गावडे हे आंबोली गावचे प्रमुख गावकर तर आहेतच शिवाय आंबोली मध्ये राजकीय दृष्ट्या त्यांचे मोठे राजकीय वजनही आहे त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असून शिवसेनेमध्ये उत्साह आहे
पालकमंत्री दीपक केसरकर हे निवडणुकी चा अर्ज भरण्यापूर्वी माऊली मंदिरात माऊली देवीचे दर्शन घेण्यासाठी म्हणून आले होते तसेच पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम यावेळी ठेवण्यात आला होता दीपक केसरकर यांनी आतापर्यंत आंबोली चौकुळ वगैरे यातील गावांसाठी गेलेला माहिती व केलेली कामे यांचा लेखाजोखा ग्रामस्थांना समोर मांडला तसेच मोठ्या संख्येने पक्ष प्रवेशही त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले यावेळी आंबोलीतील आणखीनही प्रमुख गावकर दुबा जी राऊत कांता सावंत शिवराम गुरव कानू गुरव विजय परब दत्ताराम गावडे लक्ष्मण गावडे तिमाजी गावडे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला शशिकांत गावडे यांना पक्षात प्रवेश याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माऊली मंदिर आणि गावाच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळला त्यांनी ज्यावेळी शब्द दिला होता त्याच वेळी मी त्यांना सांगितले होते की आपण आंबोलीतील ही विकास कामे केली तर आम्ही तुमच्यासोबत येऊन त्यांनी तो शब्द पाळला म्हणून आम्ही सर्व पक्षात प्रवेश करत आहोत असे सांगितले तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की शशिकांत गावडे आणि अन्य गावकर मंडळींचा पक्षप्रवेश हा सर्वात आनंद देणारा आहे व आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंद दिवस आहे त्यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांच्या हातावर शिवबंधन बांधले व पक्षप्रवेश करून घेतला तसेच त्यांनी जमीन प्रश्न असो किंवा अन्य विकास कामांबाबत आंबोली ग्रामस्थांनी आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे तो आपण सार्थकी लावत आहोत याही पुढे लावणार असेही सांगितले त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असून येत्या काळात शिवसेनेची बाजू वरचढ असणार आहे एवढे मात्र नक्की. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे सरपंच लीना राऊत पंचायत समिती सदस्य मोहन चव्हाण विलास गावडे रुपेश गावडे चौकुळ सरपंच रीता गावडे केशव गावडे माजी सरपंच विजय गावडे काशीराम राऊत रुपेश गावडे दत्तू नार्वेकर सुनील नार्वेकर मायकल डिसोजा हेमंत नार्वेकर विशाल बांदेकर उत्तम नार्वेकर गजानन करपे परेश करपे आदी उपस्थित होते
आंबोलीतील प्रमुख कबुलायतदार गावकर सेनेत दाखल…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES