ठेकेदार दादा नगनूर यांचे सहकार्य; रूग्ण व नातेवाईकांकडून समाधान….
सावंतवाडी,ता.२२: येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभाग समोरील रॅम्पची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून दुरुस्त करण्यात आली. त्यासाठी सावंतवाडीतील ठेकेदार दादा नगनूर यांनी सहकार्य केले. दरम्यान हा भाग नूतनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे बांधिलकीचे रवी जाधव यांनी सांगितले.
यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव व रुपा मुद्राळे तसेच पाठपुरावा केला. हा भाग खराब झाल्याने स्ट्रेचरद्वारे खडबडीत रस्त्यावरून अपघातग्रस्त रुग्ण रूग्णालयात नेताना अडचणीचे होत होते तसेच त्या रूग्णाला त्रास होत असे हा प्रकार लक्षात आल्यानंतर श्री. जाधव यांनी पुढाकार घेऊन ठेकेदार नगनूर यांच्या सहकार्याने हा रस्ता तयार केला.