माजी खेळाडूंच्या बैठकीत निर्णय; २९ तारखेला सावंतवाडी होणार स्नेह मेळावा…
सावंतवाडी,ता.२२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ कबड्डी पटवून पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबरला सकाळी १० वाजता सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालय या सभागृह ज्येष्ठ कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत कबड्डीपटूंच्या माध्यमातून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकेकाळी कबड्डी मोठ्या प्रमाणात केली जात होती. परंतु सद्यस्थिती लक्षात घेता या खेळाकडे तितकेसे खेळाडू वळताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कबड्डी बाबत जनजागृती करण्याचा निर्णय माजी कबड्डी पटूंकडून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कबड्डीपटू रणजीतसिंह राणे, वसंत जाधव, प्रकाश बिद्रे, अनिल हळदीवे, विनायक पराडकर, जावेद शेख, शरद शिरोडकर, ॲड. सुरेंद्र बांदेकर, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, दिलीप मापसेकर, जयराम वायंगणकर, सुभाष भोगण, अजय जाधव आदी उपस्थित होते.