Monday, January 13, 2025
Google search engine
HomeUncategorizedदेवसू येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक, दोघेजण जखमी...

देवसू येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक, दोघेजण जखमी…

सावंतवाडी,ता.२२: दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने देवसू येथे झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. चंद्रकांत चव्हाण व विजय शंकर पेडणेकर (रा.म्हापण, सध्या रा. मुंबई) असे त्यांची नावे आहेत. याप्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चालक मुरार प्रभू (रा. पाट-परबवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास देवसु-कुंभेश्वरवाडी परिसरात घडली. जखमींना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रभू यांच्या विरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments