Friday, May 23, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकडावल मधील स्वाभिमानचे कार्यकर्ते शिवसेनेत...

कडावल मधील स्वाभिमानचे कार्यकर्ते शिवसेनेत…

माणगाव ता.०१: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते तथा कडावल ग्रामपंचायतीचे उपसरपंच व अन्य तीन ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत त्यांना हा प्रवेश देण्यात आला.
कणकवली विजय भवन येथे आज कडावल गावचे उपसरपंच विद्याधर मुंज, ग्रामपंचायत सदस्य आनंद तेरसे, ग्रा. पं. सदस्या मिता मुंज, ग्रा.पं.सदस्या स्वाती साळूंखे यासह सामाजिक कार्यकर्ते महाबळेश्वर मिराशी, अमोघ मुंज व कडावल मधील ग्रामस्थांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सर्वांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून पक्षात सर्वांचे स्वागत केले.
प्रवेश कर्त्यांचा पक्षात योग्य मानसन्मान केला जाईल, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वानी जोमाने कामाला लागा. आपल्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांपर्यत पोहोचवा. जिल्हा प्रलंबित विकास कामे आहेत ती येत्या काळात पूर्ण केली जाणार आहेत. अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी विभाग प्रमुख पप्पू पालव, कडावल शाखा प्रमुख विजय सावंत, संदीप सावंत, आनंद मर्गज, तातू मर्गज आदिंसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments