सावंतवाडीत समता महिला मंडळाच्यावतीने उद्या शारदोत्सव कार्यक्रम…

2

सावंतवाडी ता.०२:

येथील समता महिला मंडळाच्यावतीने उद्या दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सायं.४:०० ते ६:३० या वेळेत येथील मातृछाया मंगल कार्यालयात प्रतिवर्षी प्रमाणे शारदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त महिलांसाठी खास ६०% लाल भोपळ्यापासून बनविलेल्या तिखट व गोड पदार्थांची पाककला स्पर्धा व एक मिनिट स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा चार ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे तर याच दिवशी “ओल्ड इज गोल्ड” वर आधारीत नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी स्पर्धेत व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

3

4