सावंतवाडी विधानसभा लढवणार; राज ठाकरेंच्या उपस्थितीत केला प्रवेश…
दोडामार्ग .०२:
शिवसेनेतून तिकीट मिळण्यास अडचणी निर्माण झालेले तेथील इच्छुक उमेदवार तथा शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर यांनी आज बंडखोरी करत मनसेत प्रवेश केला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी मनसेचा पर्याय स्वीकारला.त्यांना आता सावंतवाडीत मनसेकडून विधानसभेवर संधी देण्यात येणार आहे.
श्री.रेडकर हे गेले काही दिवस सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते.त्यांनी आपण शिवसेनेतून निवडणूक लढवू असे जाहीर केले होते.मात्र अधिकृत एबी फाॅर्म हा दीपक केसरकर यांना मिळाल्यामुळे श्री.रेडकर यांची संधी हुकली.त्यामुळे त्यांनी मनसे जाण्याचा निर्णय घेतला.आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मनसेत प्रवेश केला.