रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून युतीच्या प्रचारास सुरवात…

103
2
Google search engine
Google search engine
Google search engine

.कुडाळ- मालवणातील जनता भरघोस मतांनी विजयी करेल ; आम. वैभव नाईक यांनी व्यक्त केला विश्वास…

मालवण, ता. २ : शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार वैभव नाईक यांनी आज शहराचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्‍वर, श्रीदेव नारायण चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला. पाच वर्षाचा कार्यकाळात गावागावात विकासाची गंगा पोचविण्यात आली आहे. लोकांनी आपला आमदार मला मानले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता पाठीशी राहून भरघोस मतांनी आपल्याला निवडून देतील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी आज येथे व्यक्त केला.
उद्या शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार म्हणून उद्या सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यात मतदार संघातील युतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री. नाईक यांनी यावेळी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज आमदार वैभव नाईक यांनी शहराचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्‍वर, श्रीदेव नारायण, श्रीदेवी सातेरी चरणी श्रीफळ अर्पण करत प्रचाराची सुरवात केली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, बाबी जोगी, पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, नंदा सारंग, दीपा शिंदे, अंजना सामंत, विद्या फर्नांडिस, सुनीता जाधव, रश्मी परुळेकर, नीलम शिंदे, किरण वाळके, मंदार ओरसकर, यशवंत गावकर, महेंद्र म्हाडगुत, राजा शंकरदास, किसन मांजरेकर, नरेश हुले, रवी तळाशिलकर, गीतेश कडू, गौरव वेर्लेकर, धीरज परब, आप्पा गावकर, मकरंद चोपडेकर, अन्वय प्रभू यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्यापासून मतदार संघात प्रचारास सुरवात केली जाणार असल्याचेही आम. नाईक यांनी स्पष्ट केले.

\