सावंतवाडी युवासेनेच्या समन्वयक पदी गुणाजी गावडे यांची निवड…

102
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,०२: येथील युवा सेनेच्या सावंतवाडी समन्वयकपदी वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांची आज निवड करण्यात आली.

यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या हस्ते त्यांना नेमणूक पत्र देण्यात आले. दरम्यान पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी निश्चितच आपण यशस्वी करणार असून आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांना जास्तीत जास्त मताधिक्‍य मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे श्री गावडे यांनी सांगितले.सावंतवाडी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची बैठक शिवसेना संपर्कप्रमुख शैलेशजी परब, युवासेना विस्तारक राम राणे, सावंतवाडी विधानसभाप्रमुख विक्रांतजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदारजी शिरसाट,युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख योगेश नाईक,युवासेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख पंकज शिरसाट,युवासेना दोडामार्ग तालुकाप्रमुख भिवा गवस, मदन राणे यांच्या सहकार्याने विधानसभेतील सर्व युवासेना विभागप्रमुख उपस्थित होते.

\