“सिगल युज प्लास्टिक” वापर टाळण्यासाठी घेतली शपथ…

153
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला पालिकेची नागरीकांच्या सहकार्याने कॅम्प परिसरात स्वच्छता मोहिम…

वेंगुर्ले ता.०२: नगरपरिषदेच्यावतीने आज महात्मा गांधी जयंती निमित्त ‘स्वच्छता हिच सेवा‘ या उपक्रमांतर्गत वेंगुर्ला-कॅम्प परिसरात नागरीकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये सिगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी नागरीकांना शपथ देण्यात आली.वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर सर्वप्रथम गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित नागरीकांनी ‘मी माझ्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर करणार नाही आणि इतरांना ते करण्यापासून परावृत्त करेन. मला माहित आहे की,स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करील‘ अशा आशयाची शपथ घेतली.
यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी वैभव साबळे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत उपस्थित होते.
या उपक्रमात माझा वेंगुर्ला, रोटरी क्लब मिडटाऊन, छत्रपती कला-क्रिडा मंडळ भटवाडी, जागृती कला क्रिडा मंडळ, आनंदवाडी मित्रमंडळ, शहरातील महिला बचतगट, वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, मेडिकल कॉलेज, बॅ.खर्डेकर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, हायस्कूल व शाळांचे विद्यार्थी, नगरसेवक, नगरपरिषदेचे कार्यालयीन कर्मचारी, सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कॅम्प मैदानावर ‘आजपासून मी सिगल युज प्लास्टिक वापरणार नाही, गुड बाय सिगल युज प्लास्टिक‘ अशा आशयाचा बनवलेला प्लास्टिक बॅन सेल्फि पॉईंट सर्वांचे आकर्षण ठरला होता.

\