बांधकाम विभागाने केले वायंगणी प्लॅस्टिक मुक्त…

2

सिंधुदुर्गनगरी, ता. २ : केंद्र सरकारच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने बुधवारी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त राबविलेल्या ‘प्लॅस्टिक पिक अप डे’ उपक्रमाअंतर्गत मालवण तालुक्यातील वायंगणी गावात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने उपक्रम राबविला. २० गोण्या भरून प्लॅस्टिक गोळा करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता पी. एस. पाटील, मालवणचे उपअभियंता श्री. चौगुले, देवगड उपअभियंता एम. पी. पाचपींपळे, वायंगणी सरपंच, वायंगणी हायस्कूलचे विद्यार्थी व ग्रामस्थ तसेच बांधकाम विभागातील अन्य अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

7

4