सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात मनसेचे उमेदवार जाहीर

100
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली -राजन दाभोलकर, कुडाळ -धीरज परब, सावंतवाडी-प्रकाश रेडकर

कणकवली, ता. २ :

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करीत असुन कणकवली विधानसभा मतदार संघातुन मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्यानावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असुन कुडाळ विधानसभा मतदारसंघात त्या भागाचे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचे नाव निश्चित झाले आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात नुकतेच मनसेत प्रवेश करणारे प्रकाश रेडकर यांच्या नावाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी हिरवा कंदील दिला असल्याचे माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यानी दिली.महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात निडणुक लढविणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी महाराष्ट्र नवनिर्माणसेना राज्यात 100 जागा स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सिंधुदुर्गात नेमके किती उमेदवार मनसे देते याकडे लक्ष लागुन राहीले होते. मुंबई येथे राज ठाकरे यानी मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये सिंधुदुर्गातील तीन्ही मतदारसंघात उमेदवार देत निवडणुकीत चुरस आणली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या स्थापनेपासुन सिंधुदुर्गात कार्यरत असलेले आणि मनसे संघटना वाढीसाठी महत्वाचे योगदान देणार्‍या मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर याना कणकवली विधानसभा मतदारसंघातुन निवडणुक रिंगणात उतरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. गेली अनेक वर्षे राजन दाभोलकर हे मनसे संघटनेच्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. आर्थिक बिकट परिस्थितीतही संघटना वाढीसाठी त्यानी दिलेले योगदान लक्षात घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी राजन दाभोलकर याना उमेदवारी देत मनसेतील प्रामाणिक कार्यकर्ता न्याय दिल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. तर कुडाळ विधानसभा मतदारसंघातुन मनसेचे आक्रमक जिल्हाध्यक्ष धीरज परब याना उमेदवारी देत मराठा समाजाच्या मतावरही राज ठाकरे यानी लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असल्याचे दिसुन येते. धीरज परब यानी माजी आम.परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये भाग घेत संघटना वाढीसाठी योगदान दिले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मनसेने धक्कातंत्राचा वापर करत शिवसेना तालुकासंपर्कप्रमुख प्रकाश रेडकर यांचा मनसेत प्रवेश करत त्याना पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात निवडणुक रिंगणात उतरविले आहे. मनसेने सिंधुदुर्गातील तीन्ही मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करत निवडणुक चुरशीची करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
मनसेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मनसेचे उमेदवार प्रचाराची यंत्रणा राबविणार असुन परशुराम उपरकर यानी तब्येतीचे कारणदेत निवडणुकीच्या रिंगणापासुन दुर राहणे पसंत केले असुन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रचाराची संपुर्ण जबाबदारी मात्र त्यांच्याच खांद्यावरच राहणार आहे.

\