कुडाळ- मालवण मधून काँग्रेसकडून काका कुडाळकर यांना उमेदवारी…

78
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ- मालवण मधून काँग्रेसकडून काका कुडाळकर यांना उमेदवारी…

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर ; ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार…

मालवण, ता. ३ : कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती श्री. कुडाळकर यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीकडून कोणास उमेदवारी मिळते. याकडे मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असतानाही काँग्रेसकडून गेल्या काही दिवसात उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती. अखेर आज काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत कुडाळ- मालवण मतदार संघातून हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होत नसल्याने काका कुडाळकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. मात्र काँग्रेसच्यावतीने आज जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत काका कुडाळकर यांना कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

\