सावंतवाडीतील बेपत्ता मुलगा मध्यप्रदेशात सापडला…

132
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता 3
येथून बेपत्ता झालेल्या शाळकरी निखील गुप्ता वय 14 हा शाळकरी मुलगा मध्यप्रदेशात सापडला आहे. गळ्यात असलेल्या आयकार्ड मुळे त्याचा शोध लागणे शक्य झाले.
तेथील एका ट्रकचालकाचा हुशारीमुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे. दरम्यान त्या मुलाला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी पोलिसांचे पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले. संबंधित मुलगा हा पाच ते सहा दिवसांपूर्वी सावंतवाडी दोन बेपत्ता झाला होता. आपण क्लासला जातो असे सांगून तो घरातून निघून गेला होता.दरम्यान त्याचे लोकेशन रत्नागिरी त्यानंतर सहारा एअरपोर्ट दाखवत होते. मात्र आता तो मध्यप्रदेशात सापडला आहे. तेथील एका ट्रक चालकाला या लहान मुला विषयी संशय आला. त्यामुळे त्यांने निखील याला पकडून ठेवले. त्याच्या गळ्यात असलेल्या आयकार्ड वरील माहिती घेऊन थेट शाळेत फोन लावला व शिक्षकांना माहिती दिली. शाळेतील शिक्षकांनी त्याला सोडू नका पोलिसांच्या ताब्यात द्या अशी विनवणी केली. त्यानुसार मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे.त्याला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांचे पथक रवाना झाले आहे.

\