जोरदार शक्तिप्रदर्शन करून केसरकर, नाईक भरणार आपले अर्ज…

2

बंडखोर पारकर व तेली कडुन शक्तिप्रदर्शन: नितेश राणे सतीश सावंतांचा उद्याचा मुहूर्त…?

सिंधुदुर्गनगरी,ता.०३
विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार वैभव नाईक यांच्यासह भाजपाचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर व प्रदेश सरचिटणीस राजन तेली हे चौघेही आज जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्त चौघांकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर, आमदार नितेश राणे, काँग्रेसचे उमेदवार काका कुडाळकर हे तिघे उद्या आपला अर्ज भरण्याची शक्यता आहे. तर राणे कुटुंबाची साथ सोडलेले सतीश सावंत यांच्याबाबत अद्याप पर्यंत चित्र स्पष्ट झाले नाही. मनसेचे उमेदवार प्रकाश रेडकर, धीरज परब व राजन दाभोलकर हेसुद्धा आपले उमेदवारी अर्ज उद्या दाखल करण्याची शक्यता आहे.

2

4