सभागृह “ओवरफ्लो”;भाजपाचे झेंडे घेवून कार्यकर्त्यांची हजेरी…
सावंतवाडी ता.०३: भाजपचे बंडखोर उमेदवार राजन तेली यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले.त्यांना अद्याप पर्यंत पक्षाचे तिकीट जाहीर झाले नसले तरी भाजपाचे चिन्ह असलेले झेंडे,टोप्या आणि शेले घालून त्यांच्या कार्यकर्त्यानी उपस्थिती दर्शवली.यावेळी त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या येथील रवींद्र मंगल कार्यालयातील हॉल “ओवरफ्लो” झाला आहे.
.आता काही वेळात श्री.तेली मेळाव्यात उपस्थिती दाखवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.या सर्व शक्ती प्रदर्शनानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांना युतीचे तिकीट जाहीर झाले असले, तरी युतीत बेबनाव झाल्याचे तुर्तास तरी चित्र स्पष्ट होत आहे.