ही माझी शेवटची “टर्म”…यानंतर पुन्हा निवडणूक लढणार नाही…

2

दीपक केसरकर; शिवरामराजें पाच वेळा निवडून आले होते,त्यांचा आदर्श घेईन

सावंतवाडी ता.०३:

“मी” शिवरामराजेंचा इतिहास घेऊन पुन्हा एकदा निवडणूकीत उभे राहिलो आहे.ते पाच वेळा निवडून आले होते,परंतु आता ही माझी शेवटची टर्म आहे.काही झाले तरी “मी” हॅट्रीक साधेन,असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.आमदार नितेश राणे यांनी पहिला फॉर्म तरी भरू दे,त्यानंतर मी बोलेन,राजन तेली बाबत भाजपाचे वरिष्ठ निर्णय घेतील.असे त्यांनी सांगितले .
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर श्री.केसरकर यांनी पत्रकारांची संवाद साधला.यावेळी त्यांनी हि आपली शेवटची टर्म आहे.यानंतर आपला राजकीय वारसदार कोणतरी दुसरा असेल.या ठिकाणी तिसर्‍यांदा कोणी निवडून येत नाही,असे भासवले जाते परंतु मात्र शिवराम राजे तब्बल पाच वेळा निवडून आले होते.मी काही पुन्हा इच्छूक नाही. ही माझी शेवटची टर्म आहे.त्यामुळे निश्चितच मी हॅट्रीक साधेन असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

3

4