दत्ता सामंतांचा ठाकरे शिवसेनेला धक्का ; सुनील घाडीगावकर, दादा परब यांचा पुढाकार…
मालवण, ता. ०८ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी तालुक्यातील ओवळीये गावात ठाकरे शिवसेनेला धक्का दिला आहे. सरपंच रंजना सहदेव पडवळ यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह काल रात्री श्री. सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. श्री. सामंत यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
सरपंच रंजना घाडीगावकर यांच्यासह सहदेव पडवळ, अमोल घाडीगावकर, अजित जंगम, नागेश घाडीगावकर, संकेत घाडीगावकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, दादा परब, समीर सावंत, पप्पू निर्गुण, बबन परब, नंदू आंगणे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.