Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआदर्श मुख्याध्यापक सुरेश सावंत यांचे निधन

आदर्श मुख्याध्यापक सुरेश सावंत यांचे निधन

बांदा.ता,०३:
कोलझर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश गोविंद सावंत (वय ७०) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचेवर मुंबई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
त्यांनी दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात प्राथमिक शाळेत ज्ञानदानाचे कार्य केले. उपक्रमशील शिक्षक म्हणून ते परिचित होते. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले होते. तसेच जनसेवा निधी ट्रस्ट, सावंतवाडी संस्थान मराठा समाज, पर्यावरण मित्र व विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते. गावातील तसेच दोडामार्ग तालुक्यातील शैक्षणिक चळवळीत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. गेले काही दिवस ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांचेवर मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातू, २ भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. येथील पत्रकार निलेश मोरजकर यांचे ते मामा होत.
फोटो:-
सुरेश सावंत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments