पोरं-बाळं होण्यापूर्वी राणेंचा स्वाभिमान पक्ष संपला

128
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विनायक राऊत:नसती “बॅद” ओढवून घेतली म्हणून बबन साळगावकरांवर टिका

सावंतवाडी ता,०३:  
पोरं-बाळं होण्यापूर्वीच स्वाभिमान पक्षाचे राणेंना विसर्जन करावे लागले,हे त्यांचे अपयश आहे,अशी टीका शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला ही “बॅद” पदरात पाडून घेऊ नका असे आवाहन आपण त्यावेळी केसरकरांना केले होते.परंतु त्यांनी माझे ऐकले नाही.आता हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत उभे राहून दाखवावे आम्ही त्यांचा नक्कीच पाडाव करू,अशी टीका त्यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे नाव न घेता केली.
पालकमंत्री दीपक केसरकर व शिवसेनेचे वैभव नाईक यांनी एकही गैरकृत्य केले नाही ,त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.श्री.राऊत यांनी आज येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शविली. या मेळाव्यापूर्वी केसरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना श्री.राऊत यांनी राणे व बबन साळगावकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला,ते म्हणाले येणाऱ्या निवडणुकीत चांगल्या व्यक्तीमत्वाच्या पाठीशी येथील जनतेने ठामपणे उभे राहावे.जे आज भाजपमध्ये प्रवेश करते झाले आहेत, त्यांनी अनेक लोकांचे संसार उध्वस्त केले.लोकांनी केलेले उपकार ते विसरले,अनेकांची मानगुटी उडवली. परंतु आमच्या पालकमंत्री अथवा आमदाराकडून कोणतेही वाईट काम किंवा गैरकृत्य झालेले नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.
उद्धव ठाकरे यांचा सावंतवाडी येथे १६ तारखेला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.यावेळी बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राऊत यांनी केले. त्यांनी यावेळी इन्सुली येथील नारायण राणे यांचे कौतुक केले ” हे नारायण राणे कट्टर शिवसैनिक आहेत मात्र काही लोकांना ते जमले नाहीत हे डुबलीकेट नाहीत” असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांनी तोंडसुख घेतले.भगवा पेलण्याची ताकद कोणालाही नसते त्यामुळे अन्य पक्षांचा आसरा घ्यावा लागतो असे सांगून चिमण्यांनो परत फिरा रे असे बाळासाहेब ठाकरे ने केलेल्या आव्हानाला मान देऊन अण्णा केसरकर पुन्हा शिवसेनेत आले आहेत त्यांचे आपण स्वागत करतो असे त्यांनी सांगितले.

\